राष्ट्रवादी काँग्रेस राहुल गांधींवर नाराज
शरद पवारांच्या आत्मचरित्राच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याला राहुल गांधी आले नाहीत.
नवी दिल्ली : शरद पवारांच्या आत्मचरित्राच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याला राहुल गांधी आले नाहीत. या सोहळ्याला आमंत्रण पाठवूनही राहुल गांधी न आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नाराज झाली आहे.
राहुल गांधींच्या कार्यालयात आम्ही फोन केले पण आम्हाला साधा प्रतिसादही मिळाला नाही. या देशामध्ये पंतप्रधानांना भेटणं सोपं आहे पण राहुल गांधींना भेटणं अवघड आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी.पी.त्रिपाठी यांनी केलं आहे.
पवारांच्या आत्मचरित्राची हिंदी आवृत्ती ‘अपनी शर्तोंपर’चं प्रकाशन नवी दिल्लीमध्ये झालं. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते गुलामनबी आझाद, सीपीएमचे नेते सीताराम येचुरी, डी.राजा, जेडीयूचे के.सी.त्यागी उपस्थित होते.