नवी दिल्ली: मेडिकल प्रवेशासाठीची 'नीट' (NEET) परीक्षा यावर्षीपासूनच होणार आहे. सुप्रीम कोर्टानं याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. एआयपीएमटीच्या नावाने ही 'नीट'ची परीक्षा घेण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिली परीक्षा एक मे रोजी तर दुसरी परीक्षा 24 जुलैला होणार आहे. या परीक्षेचा निकाल 17 ऑगस्टला जाहीर होईल. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळं मात्र विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. 


राज्याची वैद्यकीय पूर्व परीक्षा म्हणजे सीईटी आहे. त्यामुळं नेमकी कोणती परीक्षा द्यावी आणि त्याची प्रक्रिया काय असणार आहे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.