बिलासपूर : केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या नवीन 2000 रुपयांच्या आणि 500 रुपयांच्या नोटेनं बिलासपूरच्या नागरिकांची झोप उडवून टाकलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिलासपूरच्या मलोखर बँकेच्या एटीएममधून काढण्यात आलेल्या नवीन 500 रुपयांच्या नोटांचे रंग फिके पडताना नागरिकांना आढळले... इतकंच नाही तर या नोटांवरील गांधीदेखील फिके पडताना दिसले. 


या नोटा पाहिल्यानंतर हे केवळ कागदांचे तुकडे आहेत की 500 रुपयाच्या नोटा? असा प्रश्न नागरिकांना पडलाय. यामुळे नागरिकांना व्यवहार करणंही कठिण होऊन बसलंय. 


लोकांच्या अडचणींत आणखी वाढ झाली जेव्हा एटीएममधून काढलेल्या या नोटा बँकांनीही स्वीकारण्यास नकार दिला... आता हातात आलेल्या नोटांचा रंग उद्यापर्यंत राहील का? अशी दहशत नागरिकांत निर्माण झालीय. त्यामुळे आता साधेसुधेही व्यवहार कसे करावे? असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय.