`पीएफ`च्या नव्या नियमावरून बंगळुरात जोरदार निदर्शनं
भविष्य निर्वाह निधीच्या पैसे काढण्यासंदर्भातील नव्या नियमाविरोधात बंगळुरूत कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शनं केली.
बंगळुरू : भविष्य निर्वाह निधीच्या पैसे काढण्यासंदर्भातील नव्या नियमाविरोधात बंगळुरूत कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शनं केली.
यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनीहवेत गोळीबारही करावा लागला. मात्र संतप्त आंदोलकांनी पार्किंगमधल्या पोलिसांच्या काही गाड्यांची जाळपोळ केली.
यावेळी आंदोलकांनी या रस्त्यांवरील मोठ्या कंपन्यांवरही हल्लाबोल केला. आंदोलकांनी गाड्यांवर दगडफेकही केली. सकाळी ९.३० वाजता आंदोलकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली.
जवळपास ४ तासांनी म्हणजेच दुपारी १ नंतर पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यास यश आलं आहे. म्हैसूर रोड, तुमकूर रोड, बेनरघाट रोड आणि शहरातल्या इतर भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती