मोदी सरकारचा मोठा झटका, या लोकांना बसू शकतो १०,०००पर्यंत दंड
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारीला सादर केलेल्या अर्थसंकल्पात लहान करदात्यांना जरुर दिलासा दिलाय. मात्र इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारखेनंतर जर कोणी टॅक्स रिटर्न भरत असेल तर लेट फी म्हणून त्या व्यक्तीस ५००० रुपये भरावे लागतील.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारीला सादर केलेल्या अर्थसंकल्पात लहान करदात्यांना जरुर दिलासा दिलाय. मात्र इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारखेनंतर जर कोणी टॅक्स रिटर्न भरत असेल तर लेट फी म्हणून त्या व्यक्तीस ५००० रुपये भरावे लागतील.
५ लाखापर्यंत उत्पन्न असणारे करदाते केवळ एक पानी फॉर्म भरुन इनकम टॅक्स रिटर्न भरु शकतात. मात्र दिलेल्या तारखेनंतर टॅक्स रिटर्न फाईल रेल्यास दंड भरावा लागेल.
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याच्या अंतिम तारखेनंतर कोणी रिटर्न भरल्याल लेट फी म्हणून त्या व्यक्ती ५००० रुपये भरावे लागतील.
जर एखादी व्यक्ती ३१ डिसेंबरनंतर रिटर्न भरतेय तर त्या व्यक्तीला दंड म्हणून १०,००० रुपये भरावे लागतील.