चेन्नई : काही न्यूज चॅनलवर दाखवण्यात आलेल्या जयललिता यांच्या निधनाच्या बातम्या खोट्या आहेत, असं स्पष्टीकरण अपोलो हॉस्पिटलनं दिलं आहे. अपोलो हॉस्पिटल आणि एम्सची डॉक्टरांची टीम जयललितांवर उपचार करत आहेत. जयललिता सध्या लाईफ सपोर्ट सिस्टीमवर आहेत, अशी प्रतिक्रियाही अपोलो हॉस्पिटलमधून देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही वेळापूर्वी एआयडीएमकेच्या मुख्यालयातला झेंडा अर्ध्यावर आणण्यात आला होता. पण आता पुन्हा एकदा हा झेंडा पूर्ण वर करून फडकवण्यात आला आहे.