नवी दिल्ली : भारतीय लष्कराचा जवान हणमंतप्पा कोप्पड १५० तासांपासून बर्फात दबला गेला होता, तरीही आज हणमंतप्पा कोप्पडला जिवंत बाहेर काढण्यात यश आलं. हा बर्फ दोन मजली इमारतीच्या बर्फा एवढा होता. मागील आठवड्यात हिमस्खलन झालं तेव्हा हणमंतप्पा दबले गेले होते. महत्वाचं म्हणजे हणमंतप्पा बर्फाच्या त्या कबरीतून जिवंत बाहेर आले.


सहा दिवसानंतरही हणमंतप्पाचा श्वास सुरू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सियाचिन १९ हजार ५०० फूट उंच आहे, २५ फुट बर्फाचा थर लागला असताना, उणे ४५ डिग्री तापमानात हणमंतप्पा कोप्पड जिवंत येणे सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे, मात्र सध्या हणमंतप्पाची प्रकृती नाजूक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे, हणमंतप्पा कोप्पडसाठी पुढील ४८ तास अतिशय महत्वाचे आहेत


परिवाराला आनंद आणि चिंताही


हणमंतप्पा कोप्पड हा धारवाडचा आहे. त्याच्या परिवारासाठी हा निश्चित आनंदाचा आणि चिंतेचाही क्षण आहे, कारण हणमंतप्पाचा मागील आठवड्यापासून शोध लागत नव्हता. हणमंतप्पा कोप्पड हा अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला आहे.


अजून धोका टळलेला नाही


हणमंतप्पा कोप्पड आणि त्यांच्या १० साथीदारांवर १ किलोमीटर रूंद आणि ८०० मीटर उंच बर्फाचा ढिग ढासळला होता.  हे दहा जवान बर्फाखाली दबले होते, त्यातील हणमंतप्पा कोप्पड जिवंत सापडला आहे, मात्र अजूनही त्याच्यावरील धोका टळलेला नाही.


तंबू आणि हणमंतप्पात हवेची पोकळी


भारतीय सेनेचे जवान २० हजार फुटांवर मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री घेऊन आपल्या १० जवानांचा शोध घेत होते, कुत्र्यांनीही त्यांना मोठी मदत केली. ऑक्सिजनची कमतरता असल्याने २० ते २५ मिनिटात बचाव कार्य थांबत होतं. बर्फ कोसळला तेव्हा हणमंतप्पा कोप्पड तंबुतच होते. यात तंबू आणि हणमंतप्पा यांच्यात हवेचा एक मोठा भाग तसाच होता. या हवेच्या पोकळीमुळे हणमंतप्पाचा जिवंत राहिले असं म्हटलं जात आहे.


पुढील ४८ तास महत्वाचे..


हणमंतप्पा कोप्पड यांना बेशुद्ध अवस्थेत, लष्कराच्या बचाव दलाने जम्मूच्या आर आर हॉस्पिटलला पोहोचवलं, आणि यानंतर दिल्लीच्या सेना रिसर्च अॅण्ड रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तात्काळ या जवानाला पाहण्यासाठी, विचारपुस करण्यासाठी हॉस्पिटलकडे धाव घेतली.