महाविद्यालयात मुलींना जीन्स घालायला बंदी
केरळ मेडीकल कॉलेज एका निर्णयामुळं वादात सापडलंय.
तिरुअनंतपुरम : केरळ मेडीकल कॉलेज एका निर्णयामुळं वादात सापडलंय.
महाविद्यालय प्रशासनानं मुलींसाठी ड्रेस कोड जाहीर केलाय. जीन्स आणि आवाज करणारे आभूषणं घालण्यास मनाई करण्यात आलीय.
त्यामुळे या निर्णयावरुन तरुणाईमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. जीन्स घालण्यास गैर काय? असा सवाल महाविद्यालयीन तरुणी विचारत आहेत.