नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी , दिल्लीमध्ये एकही दारूचे नवे दुकान सुरू झाले नसल्याची माहिती दिली आहे. यापुढे दिल्लीत आता एकही नवे दारूचे दुकान सुरू करू देणार नाही, असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरू असलेल्या दुकानांचं काय?
दिल्लीत दारूची दुकाने सुरू आहेत, त्या बाबत लवकरच मोहल्ला सभेत निर्णय घेतला जाईल, तसेच दारूची जी दुकाने सुरू आहेत ती जर बंद करावी असे दिल्लीकरांचे म्हणणे असेल तर ,या दुकानांबाबत देखील निर्णय घेतला जाईल असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.


मात्र निर्णयासाठी 'मोहल्ला सभे'त १५ टक्के जनतेचा होकार असायला हवा असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी म्हटलंय.