दुसऱ्या बॅंकेच्या ATMमधून कितीही पैसे काढा, कोणताही चार्ज नाही!
केंद्र सरकार दुसऱ्या बॅंकेच्या ATMमधून पैसे काढण्याबाबत कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, असा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबाबतच्या निर्णयासंदर्भात वित्त मंत्रालय आणि आर.बी.आय विचार विनिमय करत आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकार दुसऱ्या बॅंकेच्या ATMमधून पैसे काढण्याबाबत कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, असा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबाबतच्या निर्णयासंदर्भात वित्त मंत्रालय आणि आर.बी.आय विचार विनिमय करत आहे.
वित्त मंत्रालयाच्या सूत्रानुसार आरबीआय निर्धारित संख्येनंतर दुसऱ्या बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भात लागणारा चार्ज लवकरच समाप्त करणार आहे. मात्र, मोठ्या रक्कमेबाबत शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. १ लाख रुपयांच्यावर पैसे काढणाऱ्यांना चार्ज आकारण्याची शक्यता आहे. त्यामुळे यातून मध्यम वर्गातील लोकांना याचा लाभ मिळेल.
मर्यादीत संख्या पैसे काढण्याची असल्याने त्याच बॅंकेचे एटीएम शोधण्यासाठी भटकंती करावी लागते. तर दुसरा पर्याय वित्त मंत्रालय वाढविण्याबाबत निर्णय घेत आहे. पैसे काढण्याची मर्यादा तीनवरुन आता १० ते १५ करण्याबाबत चाचपणी करीत आहे.
ग्रामीण भागात कोणत्याही बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढणे निशुक्ल करण्याची शिफारस होऊ शकते. कारण जनधन योजनेच्या माध्यमातून देशात २० कोटी पेक्षा जास्त लोकांनी खाते काढले आहे. त्यामुळे ही सुविधा त्या लोकांपर्यंत पोहोचविणे शक्य नाही. त्यामुळे ग्रामीण भागात एटीएममधून पैसे काढणे निशुल्क असण्याची बाबत विचार होत आहे.
सध्याच्या स्थितीमध्ये ग्रामीण भागात दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरु, हैदराबाद येथे अन्य बॅंक एटीएममधून ५ वेळा पैसे काढण्याचे नि:शुल्क आहे. मात्र, शहरात ही संख्या तीन आहे.