एटीएममधून नव्या नोटा निघाल्या पण...
मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात एक आश्चर्यचकीत करणारी घटना समोर आली आहे. येथे स्टेट बँकच्या एटीएममधून नोटा तर निघाल्या पण त्यावर सिरीअल नंबरच नव्हते.
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात एक आश्चर्यचकीत करणारी घटना समोर आली आहे. येथे स्टेट बँकच्या एटीएममधून नोटा तर निघाल्या पण त्यावर सिरीअल नंबरच नव्हते.
रिपोर्टनुसार शिक्षक नारायण अहिरवाल यांनी सोमवारी जेव्हा एटीएममधून एक हजार रुपये काढले तेव्हा त्यातून ५०० च्या २ नव्या नोटा निघाल्या. ज्यावर नंबरच नव्हता. या घटनेनंतर त्यांनी एटीएमच्या आजुबाजुच्या लोकांना नोटा दाखवल्या. त्यानंतर आणखी एक व्यक्तीने जेव्हा पैसे काढले त्यांना पण अशाच नोटा मिळाल्या. यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे पोहोचलं.