बंगळुरु : असे म्हटले जाते की, लग्न केल्यानंतर दोन कुटुंब जोडली जातात त्याचबरोबर दोघांचे मनोमिलन होते, असा विश्वास कायम असतो. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयात पती आणि पत्नी दोघांनी एकमेकांविरोधात सेक्स न केल्याचा आरोप करत घटस्फोटासाठी चक्क अर्ज केला.


संबंध राहिलेत नाहीत म्हणून...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, उच्च न्यायालयाने या विवाहित जोडप्याच्या घटस्फोटला मंजुरीही दिली आहे. कारण, लग्नानंतर दोघांमध्ये पहिल्या रात्रीपासून संबंध राहिलेत नाहीत. उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले, हे प्रकरण शारीरिक अक्षमता तसेच दुसरे कोणतेही कारण नाही. सेक्सची असफलताही नाही. ही प्रथा आहे की, लग्नानंतर पहिल्यांदा मुलाच्या घरी आणि नंतर मुलीच्या घरी रिसेप्शन आयोजिक करण्यात येते.


वचन दिले होते पण...


पतीने लग्नानंतर म्हैसूरमध्ये शिफ्ट होण्याचे वचन दिले होते. मात्र, दोन महिन्यानंतर कारण दिले की माझी बदली होत नाही. तर पत्नीने आरोप केलाय की माझ्या कुटुंबीयांनी पहिल्या रात्रीचा (First Night) कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, या कार्यक्रमात पती सहभागी झालेला नाही. त्यानंतर कोर्टाने घटस्फोटाला मंजुरी दिली. पती म्हैसूर येथे उप-रजिस्ट्रार आहे तर पत्नी शिवमोगात विश्लेषक आहे.