राष्ट्रीय महामार्गासह सर्व टोल माफ
आता देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर आणि राज्यातील सर्व रस्त्यांवरील टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा केली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर गोंधळ उडाळा आहे. तसेच पैसे स्विकारण्यात अडथळा निर्माण होत असल्याने आता देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गासह महाराष्ट्र राज्यातील टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत.
आता देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर आणि राज्यातील सर्व रस्त्यांवरील टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा केली आहे.
रस्त्यावरील आणि महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 11 नोव्हेंबरपर्यंत ही सुट देण्यात देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. याबाबत गडकरी यांनी ट्विट केलेय. 11 नोव्हेंबरपर्यंत ही सुट देण्यात आली आहे. ही सुट 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत राहणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनीही राज्यातील टोल माफ असल्याची घोषणा केली आहे.