हेलसिंकी : फिनलँडची टेलिकॉम इक्विपमेंट कंपनी 'नोकिया'नं जागतिक स्तरावर हँडसेट आणि टॅबलेट बाजारात पुन्हा एकदा नव्या जोमानं उतरण्याचा निर्णय घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या ब्रँड लायसेन्सिंगच्या माध्यमातून 'स्मार्ट' जगतात अपडेट होऊन नोकिया बाजारात दाखल होणार आहे.


कधी काळी 'नंबर एक'वर पोहचलेल्या नोकियानं दिलेल्या माहितीनुसार, 'एमएमडी ग्लोबल लिमिटेडला आम्ही एक्सक्लुझिव्ह वैश्विक लायसन्स देणार आहोत. ज्यामुळे येत्या दहा वर्षांत नोकिया ब्रँडचे मोबाईल फॅन आणि टॅबलेट बनवले जाऊ शकतील'.


'एचएमडी ग्लोबल' आणि तैवानची भागीदार 'फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी समूहा'ची एफआयएच मोबाईल मायक्रोसॉफ्टचा फिचर फोन व्यापार ३५ करोड डॉलरमध्ये आपल्या ताब्यात घेणार आहे. २०१४ साली मायक्रोसॉफ्टनं नोकियाचा ताबा आपल्याकडे घेतला होता.