नोटाबंदी आणि संसदेतील कोंडी : मोदी सरकार विरोधकांपुढे झुकण्याची चिन्हं!
संसदेतील कोंडी सातव्या दिवशी फुटण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतील चर्चेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. आधी मी कोणतीही चर्चा करणार नाही, असे मोदींनी म्हटले होते.
नवी दिल्ली : संसदेतील कोंडी सातव्या दिवशी फुटण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतील चर्चेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. आधी मी कोणतीही चर्चा करणार नाही, असे मोदींनी म्हटले होते.
चार आठवड्याच्या संसद अधिवेशनचा दुसरा आठवडा कामकाजाविना खंडित झाल्यामुळे सरकारने विरोधकांशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. नोटबंदीचा मुद्दा संसदेमध्ये चांगलाच गाजत आहे. सलग सहाव्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांत त्याचेच पडसाद पाहायला मिळाले.
या गदारोळामुळे संसदेची दोन्ही सभागृहं दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. त्याआधी पंतप्रधान सभागृहात येत नाहीत या मुद्द्यावरुन विरोधी पक्षाच्या 200 खासदारांनी संसद परिसरात आंदोलनही केलं. त्यामुळे आता विरोधकांच्या आक्रमक भूमिकेपुढे् सरकार झुकण्याची चिन्हं दिसत आहे.