तुम्ही असे फसलात! आता प्रत्येक जमा रकमेवर लागणार ६० % टॅक्स
इन्कम टॅक्स अधिकारी एप्रिलपासून आतापर्यंत बॅंकेत जमा होणाऱ्या कॅश डिपॉझीटवर नोटीस पाठवणार आहे. त्यांना ६० टक्के टॅक्स वसूल करण्याचा अधिकार मिळू शकतो.
नवी दिल्ली : ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर अडीच लाख रुपये आपल्या बॅंक खात्यात जमा करणाऱ्यांना आयकर करातून सूट मिळेल. मात्र, आता असे वृत्त आहे की, इन्कम टॅक्स अधिकारी एप्रिलपासून आतापर्यंत बॅंकेत जमा होणाऱ्या कॅश डिपॉझीटवर नोटीस पाठवणार आहे. त्यांना ६० टक्के टॅक्स वसूल करण्याचा अधिकार मिळू शकतो.
इन्कम टॅक्स कायद्यात सुधारणा करण्याबाबत संशोधनात अद्याप ठोसकाही सांगण्यात आलेले नाही. किती रक्कम बॅंकेत जमा केल्यानंतर कॅश डिपॉझीटवर स्क्रूटनी असेल. १ एप्रिलनंतर ज्या लहान खातेदारांनी आपल्या खात्यात २ ते ४ लाख रुपये जमा केले असतील त्यांना याचा फटका बसणार आहे.
ज्या लोकांकडे घरात थोडी कॅश होती. मात्र, ती कॅश जमा केली असेल आणि त्याचा इन्कम सोर्स सांगता आला नाही तर त्यांच्यांकडून ६० टक्के टॅक्स, सरचार्ज किंवा दंड वसूल केला जाईल. प्रत्येक मोठ्या रक्कमेवर स्पष्टीकरण देणे बंधनकारक आहे. ज्यांना नोटीस मिळेल त्यांना तुमच्याकडे कोठून पैसे आले याची माहिती द्यावी लागेल. त्यांना योग्य माहिती देता आली नाही तर त्यांच्याकडून दंडासहीत ६० टक्के टॅक्स वसूल केला जाणार आहे.
तसेच ज्यांच्या खात्यात गेल्या १२ महिन्यांपासून कोणतेही ट्रान्जेक्सन झाले नाही. त्यांना केवळ २५ टक्के रक्कम काढण्याची अट लागू होऊ शकते.