नवी दिल्ली : ३१ मार्चनंतर जुन्या नोटा ठेवल्यास दंड आकारण्यात येणार आहे. केंद्रीय कॅबिनेटने या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. १० पेक्षा जास्त जुन्या नोटा ठेवल्यास किमान ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चलनातून रद्द करण्यात आलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा असलेल्यांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जुन्या नोटांसंदर्भातील अध्यादेश जारी करण्यात आला आहे.


चलनातील रद्द जुन्या नोटा बाळगल्सास दंडात्मक कारवाईसह ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. या नियमांचा भंग केल्यास किमान ५० हजार किंवा सापडलेल्या रकमेच्या पाचपट रक्कम दंड म्हणून भरावा लागण्याची शक्यता आहे. 
 
चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत ३० डिसेंबरपर्यंतची आहे.