पाटणा :  मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये संपूर्ण दारुबंदी केली आहे. मात्र नरकतीगंज मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार विनय वर्मा दारु पिताना कॅमेऱ्यामध्ये कैद झाले . विनय शर्मा यांना त्याबद्दल काँग्रेसने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतामध्ये तयार झालेले परदेशी मद्य, व्हिडिओमध्ये वर्मा हे आपल्या पाहुण्यांसोबत दारु पित असल्याचे दिसत आहे. याबद्दल काँग्रेसने वर्मा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 


भारतामध्ये गुजरात, नागालॅंड आणि मिझोराम नंतर या दारुबंदी असलेले बिहार हे चौथे राज्य ठरले आहे. बिहारमध्येही आता दारु पिणे, विक्री करणे किंवा कोणालाही देणे हा गुन्हा आहे. असा गुन्हा करणाऱ्यांना दहा वर्षांपर्यंतची कैद किंवा एक लाखापासून ते दहा लाखापर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.