मुंबई नाही राहिली आता देशाची आर्थिक राजधानी, या शहराने टाकलं मागे
आर्थिक राजधानी म्हणून नावाजलेले शहर म्हणजे मुंबई. पण आता मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी नाही राहिली. दिल्लीने मुंबईची हा दर्जा खेचून घेतला आहे. ऑक्सफोर्ड इकॉनमिक्सने केलेल्या एका सर्वेमध्ये जगातील ५० मेट्रोपोलिन इकॉनमिक शहरांमध्ये दिल्लीला ३० वं स्थान मिळालं आहे. मुंबई या यादीत ३१ व्या स्थानी आहे.
मुंबई : आर्थिक राजधानी म्हणून नावाजलेले शहर म्हणजे मुंबई. पण आता मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी नाही राहिली. दिल्लीने मुंबईची हा दर्जा खेचून घेतला आहे. ऑक्सफोर्ड इकॉनमिक्सने केलेल्या एका सर्वेमध्ये जगातील ५० मेट्रोपोलिन इकॉनमिक शहरांमध्ये दिल्लीला ३० वं स्थान मिळालं आहे. मुंबई या यादीत ३१ व्या स्थानी आहे.
सर्वे रिपोर्टनुसार दिल्लीचा शहरी क्षेत्राचा विस्तार झाला आहे. गुडगाव, नोएडा, गाजियाबाद आणि फरीदाबाद या सारख्या शहरांसह दिल्ली-एनसीआरचा जीडीपी 370 अरब डॉलर म्हणजेच 25,164 अरब रुपये आहे. तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या मुंबईत नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, भिवंडी आणि पनवेल यांचा समावेश केला गेला आहे.
शहरांचा संयुक्त जीडीपी 368 अरब डॉलर आहे. भविष्यात देखील दिल्लीच याबाबतीत पुढे असणार असं या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे. जगात हे दोन्ही शहर आर्थिक केंद्र म्हणून लवकरच अजून प्रगती करतील असं म्हणण्यात आलं आहे. २०३० मध्ये जगातील आर्थिक केंद्र असणाऱ्या शहरांच्या यादीत दिल्ली ११ व्या तर मुंबई १४ व्या स्थानावर असेल असं या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं आहे.