आता फेसबुकवरही रेल्वे प्रवाशांना तक्रार करता येणार
यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एकत्रित सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचं लॉचिंग केलं आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली : यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एकत्रित सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचं लॉचिंग केलं आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
रेल्वे प्रवाशांना आता ट्विटरसोबत फेसबूकवरुनही तक्रार करणं शक्य होणार आहे. 'मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज - इंडिया' या नावाने हे फेसबूक पेज तयार करण्यात आलं आहे.
सुरेश प्रभू म्हणाले, प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर संबंधित विभागीय रेल्वे व्यवस्थापकाकडे तक्रार पाठवण्यात येईल. तक्रार पाठवल्यानंतर काय कारवाई करण्यात आली, यासाठी रेल्वे बोर्डाचं सोशल मिडिया सेल 24 तास पाहणी करेल. विशेष म्हणजे काय कारवाई करण्यात आली याची माहिती तक्रारकर्त्याला देखील फेसबूकवर दिली जाईल.
सुरेश प्रभू यांनी याविषयी बोलताना सांगितलं, 'रेल्वे सेवा सुधारण्यासाठी सर्वांनी आपलं योगदान द्याव. त्यासाठी सर्व फेसबूक वापरकर्त्यांना आमच्याशी संवाद साधण्याची विनंती करतो'. सध्या रेल्वे दिवसाला 7 हजार ट्विट्स हाताळते. ज्यामध्ये तक्रार, सल्ला आणि मदत अशा ट्विट्सचा समावेश असल्याचंही सांगण्यात येत आहे.
रेल्वेचे ट्विटरवर 10 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. मात्र सर्व रेल्वे प्रवासी ट्विटरचा वापर करत नाहीत. म्हणून इतर सोशल मिडियांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न यानिमित्ताने रेल्वेने केला आहे.