खूशखबर! आता ऑनलाईन मिळणार जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकीट
रेल्वेच्या तिकिटासाठी तुम्हाला आता लांब रांगा लावण्याची गरज भासणार नाही. रिजर्वेशनप्रमाणे तुम्ही तुम्ही तुमच्या मोबाइल फोनवरुनच जनरल तिकीट बूक करु शकणार आहात. आयआरसीटीसी लवकरच जनरल तिकीट देखील मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
मुंबई : रेल्वेच्या तिकिटासाठी तुम्हाला आता लांब रांगा लावण्याची गरज भासणार नाही. रिजर्वेशनप्रमाणे तुम्ही तुम्ही तुमच्या मोबाइल फोनवरुनच जनरल तिकीट बूक करु शकणार आहात. आयआरसीटीसी लवकरच जनरल तिकीट देखील मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी याची घोषणा केली आहे. याची घोषणा रेल्वेबजेटमध्येच करण्यात आली होती. याची सुरुवात पश्चिम रेल्वेवरील काही स्थानकांवरुन करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे ही माहिती गोळा करतायंत की कोणत्या स्थानकावरुन लोकं अधिक प्रमाणात जनरल तिकीट घेतात.
मोबाईलने बूक होणार जनरल तिकीट
सुरेश प्रभू यांच्या या योजनेवर आयआपसीटीसी काम करत असून लवकरच ही सुविधा सुरु करण्याची तयारी करत आहेत. आतापर्यंत लोकं फक्त रिसर्वेशन तिकीटच ऑनलाइन बूक करु शकत होते. रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट देखील आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्याची तयारी होत आहे.
असं मिळेल जनरल तिकीट
प्रवाशांना सर्वात आधी त्यांचा मोबाईल नंबर अॅप्लिकेशनवर रजिस्टर करावा लागेल. त्यानंतर शहराचं नाव, प्रवासाची तारीख, यूजरनेम, पासवर्ड टाकावा लागेल. यानंतर दोन ऑप्शन दिसतील की तुम्हासा जनरल तिकीट हवं की प्लॅटफॉर्म तिकीट. तिकीट खरेदी करतांना प्रवाशांना एक वॉलेट बनवावं लागेल. या वॉलेटमध्ये प्रवाशांना १०० रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंतचं तिकीट काढू शकणार आहेत. वेब पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही ते रिचार्ज करु शकणार आहात.