मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सौदी अरेबियामधील रियाध येथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)च्या आयटी आणि आयटीईएस सेंटरला भेट दिली. तिथे काम करणाऱ्या महिलांना सौदी अरेबियाचे 'गौरव' असे संबोधले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथे बुरखा घालून उपस्थित असणाऱ्या महिलांमध्ये मोदींना भेटण्यास प्रचंड उत्साह दिसला. मोदींसोबत एक सेल्फी काढून घेण्यासाठी सर्व महिलांनी एकच गर्दी केली. ज्या देशात महिलांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य मिळत नाही. अशा देशात भारतीय पंतप्रधानांनी कर्मचारी महिलांची भेट घेणे याला प्रतिकात्मक महत्त्व आहे. 


या प्रसंगी त्यांनी तिथे काम करणाऱ्या महिलांना भारतात बोलावले. भारतात तुम्हाला सर्व काही सुविधा दिल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले. पंतप्रधान सध्या दोन दिवस सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. तिथे ते सौदीच्या राजांचीही भेट घेणार आहेत. 


शनिवारी त्यांनी सौदी अरेबियात लार्सन अॅण्ड टूब्रो या कंपनीतील कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी तेथील कामगारांसोबत खानपानही केले. तेथील अनिवासी भारतीय समुदायाला मार्गदर्शन करताना भारतातील राजकीय स्थिरता हेच भारताच्या प्रगतीचे कारण असल्याचे त्याने म्हटले.