नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी कॅम्पसमध्ये रावणाच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळण्यात आल्याने आता त्यावरुन मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणाच्या चौकशीचे वाईस चान्सलर एम. जगदीश यांनी आदेश दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांना जेएनयू प्रकरणावर रिपोर्ट मागितली आहे. कुलपतींना देखील याबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी याबाबत काहीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे. या घटनेची चौकशी सुरु झाली आहे. 


एनएसयूआयने देखील त्यांच्या जेएनयू विंगविरोधात कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहेत. या पुतळा जाळण्याच्या घटनेत जे जे विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांना याबाबत विचारणा करणारी नोटीस देण्यात आली आहे. कारण पुतळा जाळणं हे जेएनयूच्या आचारसहितेच्या विरोधात आहे.


काँग्रेसच्या स्टूडेंट विंग एनएसयूआयच्या प्रतिनिधींनी जेएनयूमध्ये दसऱ्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच अमित शाह, बाबा रामदेव, साध्वी प्रज्ञा, योगी आदित्यनाथ, आसाराम, नथुराम गोडसे यांचे देखील पुतळे जाळले. यूनिवर्सिटीचे वाईस चान्सलर एम जगदेश यांचा देखील पुतळा जाळण्यात आला. पुतळा जाळतांनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


पाहा व्हिडिओ