होंगझोऊ :  'फक्त एक दक्षिण आशियाई देश दहशतवाद पसरवतोय', अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचं नाव न घेता केली आहे. नरेंद्र मोदी हे होंगझोऊमधील जी -20 परिषदेत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांवर टीका केली.


पाकिस्तानच्या 'चांगले दहशतवादी, वाईट दहशतवादी' या कल्पनेची खिल्ली उडविली उडवताना मोदी म्हणाले, आमच्यासाठी प्रत्येक दहशतवादी सारखाच असतो.


'हिंसा आणि दहशतवादाची ताकद वाढत असल्याने जगासमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. काही देश तर दहशतवादाचा वापर धोरण म्हणूनच करत आहेत. 


दक्षिण आशियामध्ये एकच देश असा आहे की तो दहशतवाद पसरवित असून, दहशतवाद्यांना साथ देत आहे. दहशतवादाला अजिबात थारा न देण्याचे भारताचे धोरण आहे', असं शेवटच्या सत्रात पंतप्रधानांनी म्हटलं आहे.