नवी दिल्ली : देशात दर तासाला एक महिला हुंड्यासंबंधित कारणांची शिकार ठरते, अशी धक्कादायक माहिती 'नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो'च्या माध्यमातून पुढे आली आहे. या आकड्यांनुसार २०१४ साली देशातील विविध राज्यांत हुंडाबळीच्या ८,४५५ घटना समोर आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुलै २०१५ साली जाहीर केलेल्या आकड्यांनुसार गेल्या तीन वर्षांत भारतात एकूण २७,७७१ महिलांचा मृत्यू हुंडासंबंधित कारणांमुळे झाला होता. यातील तब्बल ७,००० घटना केवळ उत्तर प्रदेशातील आहेत. त्यानंतर बिहारचा (३,८३०) आणि नंतर मध्य प्रदेशचा (२,२५२) क्रमांक लागतो.


खरं तर आपल्या देशात हुंडा घेणं आणि हुंडा देणं अशा दोन्ही प्रकारांवर कायद्याने बंदी आहे. हुंडा मागितल्यास व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबीयांना तीन वर्ष कारावासाची शिक्षाही होऊ शकते. हुंडाबळीसाठी जबाबदार व्यक्तींना तर जन्मठेपेची शिक्षा आहे.


असे असले तरी देशात हुंडा घेण्याची आणि देण्याची प्रथा काही बंद होत नाही. दरवर्षी हजारो महिला हुंडाबळी ठरतात. आता पुढे आलेले आकडे हादरवून सोडणारे आहेत.