नवी दिल्ली : पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय) अंतर्गत स्वस्त घरांसाठी गरीब वर्गासाठी उपलब्ध होणार असलेल्या घरांसाठी आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात यासाठी ६० हजार केंद्र उभारण्यात आले आहेत. फक्त २५ रुपय भरुन तुम्ही अर्ज करु शकणार आहात.


पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्रता 


अर्ज करण्यापूर्वी त्याची पात्रता जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या योजनेमध्ये EWS आणि LIG श्रेणीमधील कुटुंबांना घरे देण्यात येणार आहेत. 


EWS श्रेणी - कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ३ लाखाहून अधिक नसावं. 


LIG श्रेणी - कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ३ लाख ते ६ लाखाच्या मध्ये असावं.


१. अर्ज हा कुटुंबातील महिलेच्या नावाने करावा लागेल.
२. अर्जदाराचं वय 21 ते 55 वर्ष असावे
३. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे पक्क घर नसावं. 


पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज 


खाली दिलेल्या लिंकमधून तुम्ही अर्ज प्राप्त करुन तो भरुन सेंटरवर जमा करु शकता. त्यासोबत लागणारे कागदपत्रं अर्जामध्ये नमूद केले आहेत.


अर्जासाठी क्लिक करा  - ऑनलाईन अर्ज