ऑनलाईन रेल्वे तिकीटांवर सवलत, १० लाखांचा विमाही
मोदी सरकारचे ऑनलाईन खरेदीवर सवलतींची खैरात केली आहे. नोटबंदीनंतर ही सवलत दिली आहे. रोखीने होणारे व्यवहार कमी करण्यावर भर दिला.
नवी दिल्ली : मोदी सरकारचे ऑनलाईन खरेदीवर सवलतींची खैरात केली आहे. नोटबंदीनंतर ही सवलत दिली आहे. रोखीने होणारे व्यवहार कमी करण्यावर भर दिला, मोदी सरकारने भर दिल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना स्वस्तात पेट्रोल, रेल्वे तिकिट मिळेल, अशी घोषणा केली. त्याचवेळी ऑनलाईन रेल्वे तिकीट काढणाऱ्यांना १० लाखांचा विमा मिळणार आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज जाहीर केले.
केंद्र सरकारच्या कॅशलेस अर्थव्यवस्था आणि डिजिटायझेशनला अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक सवलतींचा पाऊस पाडला. रेल्वेच्या ऑनलाइन तिकिट खरेदीवर तब्बल १० लाख रुपयांचा विमा देण्याची घोषणा जेटली यांनी केली आहे.
शहरी रेल्वे लोकल तिकिटे आणि लोकल पास अशा गोष्टींची डिजिटल खरेदी करणाऱ्या उपनगरी लोकल प्रवाशांना ०.५ टक्के सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, पेट्रोल आणि डिझेलची कॅशलेस खरेदी करणाऱ्यांना इंधन खरेदीवर ०.७५ टक्क्यांची सूट देण्याची महत्त्वपूर्ण घोषणाही जेटली यांनी केली.
देशात दररोज १,८५० कोटी रुपयांच्या पेट्रोल आणि डिझेलची खरेदी विक्री होते. नोटाबंदीनंतर आम्ही क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून पेट्रोल – डिझेलचे पैसे देणाऱ्यांना ०.७५ टक्क्यांची सूट दिली, अशी माहिती जेटली यांनी दिली.