पाटणा: सत्ता आली तर राज्यात दारु बंदी करू, असं आश्वासन नितीश कुमार यांनी बिहारच्या निवडणुकांच्या आधी दिलं होतं. त्यानंतर 1 एप्रिलपासूनबिहारमध्ये दारूबंदी लागू होईल, असंही त्यांनी सांगितलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण 1 एप्रिलपासून बिहारमध्ये दारू बंदी होणार नाही, हळूहळू ही दारूबंदी लागू करण्यात येणार आहे.  पहिल्या टप्प्यामध्ये देशी दारूची निर्मिती, खरेदी आणि विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे. पण राज्यात संपूर्ण दारूबंदी येईपर्यंत  इतर प्रकारची दारू मर्यादित प्रमाणामध्ये उपलब्ध होणार आहे. 


त्यामुळे बिहारमध्ये एका दिवशी एका व्यक्तीला एकच दारूची बाटली मिळणार आहे. नव्या एक्साईज पॉलीसीची अंमलबजावणी झाल्यानंतर हा नियम लागू होणार आहे.  या नियम लागू झाल्यानंतर दारू विकत घेणाऱ्याला राज्य सरकारच्या अधिकृत दुकानामध्ये नाव रजिस्टर करावं लागणार आहे.