नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हमीरपूरमधील कुंडरा हे गाव असं आहे जेथे फक्त महिला होळी खेळतात. या गावातील सर्व महिला रामजानकी मंदिरात एकत्र होतात आणि गाणे गात होळीचा आनंद घेतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक दशकांपासून येथे महिला होळी खेळतात तर पुरुष हे शेतात काम करण्यासाठी निघून जातात. तर लहान मुलं आणि वृद्ध पुरूष हे स्वच्छ कपड्यांमध्ये घरातच असतात.


रामजानकी मंदिराजवळ काही दशकांपूर्वी एका दरोडेखोराने एका व्यक्तीची होळीच्याच दिवशी गोळी मारुन हत्या केली होती. त्यानंतर या गावात होळी खेळणं बंद झालं होतं.


गावातील महिला मात्र चूप राहिल्या नाहीत त्यांनी पुरुषांना समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी नकार दिला यानंतर महिलांनी एकत्र येऊन पुन्हा हा उत्सव सुरु केला. यानंतर महिलांनी यामध्ये पुरुषांना सहभागी न होऊ देण्याचा निर्णय घेतला.