दिल्लीवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, फ्लाइंग ऑब्जेक्ट पाडण्याचे आदेश
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने दिल्ली आणि एनसीआरमध्ये कोणत्याही प्रकारच्या यूएवी म्हणजे माणवरहित यान, रिमोटवर चालणारं हेलिकॉप्टर किंवा मायक्रोलाइट एयर क्राफ्ट, ग्लाइडर, पॅरा ग्लाइडर आणि हॉट एयर बलूनवर बंदी लावली आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे.
नवी दिल्ली : दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने दिल्ली आणि एनसीआरमध्ये कोणत्याही प्रकारच्या यूएवी म्हणजे माणवरहित यान, रिमोटवर चालणारं हेलिकॉप्टर किंवा मायक्रोलाइट एयर क्राफ्ट, ग्लाइडर, पॅरा ग्लाइडर आणि हॉट एयर बलूनवर बंदी लावली आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे.
राजधानी दिल्लीत आकाशात कोणत्याही प्रकारच्या हँग ग्लाइडर्स आणि पॅरा मोटर्सवरही बंदी घालण्यात आली आहे. अशा कोणत्याही प्रकारच्या वस्तू दिसल्याच त्याला लगेचच हवेतच ठार करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
दिल्लीमध्ये सध्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली जातेय. संसद भवन आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सगळ्या हालचालींवर सुरक्षा यंत्रणा, पोलीस प्रशासन आणि जवान लक्ष ठेवून आहेत.