मुंबई : होय मी मोदी यांचा चमचा आहे आणि त्याचा मला अभिमान वाटतो, या वक्तव्यावर माफी मागण्याचा किंवा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असं सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, मी भारतीय पंतप्रधानांचाच चमचा असणार इटलीच्या नव्हे, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.  


आगामी हिंदी चित्रपट 'उडता पंजाब'मधील ८९ दृश्‍ये आणि पंजाबविषयीचे सर्व संदर्भ काढून टाकण्याचा आदेश सेन्सॉर बोर्डाने दिल्याने प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 


बॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांनीही या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना तातडीने हटविण्याची मागणीही केली. 


उडता पंजाब या सिनेमाला अनुराग कश्‍यप यांच्या सिनेमाला 'आप'ने अर्थपुरवठा केला असल्याचा दावा निहलानी यांनी केला होता.