नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये जम्मू आणि कश्मीर अमन फोरमचे नेते सरदार रईस इंकलाबी यांनी मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तान एलओसी पार करणाऱ्या दहशतवाद्याला एक कोटी रुपये देते असं त्यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या दहशतवादी संघटनांवर पाकिस्तानमध्ये बंदी घातली जाते त्या संघटना पीओकेमध्ये आपलं स्थान मांडतात. मागील काही महिन्यांमध्ये येथील नागरिकांचा पाकिस्तानविरोधातील राग वाढला आहे. पाकिस्तान विरोधात ते विरोध-प्रदर्शन करत आहेत.


"पाकिस्तान १ कोटी रुपये देऊन लोकांची हत्या करते. त्यांना हा पैसा एलओसी पार केल्यानंतर दिला जातो. पीओकेमध्ये राहणारे लोकांचा आरोप की पाकिस्तान मानवाधिकारांचं उल्लंघन करत आहे. पाकिस्तानी सैन्य, पोलीस पाओकेमधील लोकांना त्रास देत असल्याचा आरोप होत आहे. प्रदर्शन करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला ज्यामध्ये अनेक जण जखमी झाले.