भारतीय लष्कराच्या कारवाईवर बोलले नवाज शरीफ
भारतीय लष्कराकडून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तान डिवचला गेला आहे. पाकिस्तानला यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे उमजत नाही आहे. आता पुढे काय करावं हे पाकिस्तानला सूचत नाही आहे.
नवी दिल्ली : भारतीय लष्कराकडून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तान डिवचला गेला आहे. पाकिस्तानला यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे उमजत नाही आहे. आता पुढे काय करावं हे पाकिस्तानला सूचत नाही आहे.
अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षणमंत्रींपासून ते विदेशमंत्री सगळ्यांची बोलती भारतीय सेनेने बंद केली आहे. पंतप्रधान नवाज शरीफांनी मात्र एक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, भारताने एलओसीमध्ये जी सर्जिकल स्ट्राइक केलं तो पाकिस्तानवर एक हल्ला आहे. आम्ही त्याची निंदा करतो. आम्ही शांत आहोत याला आमची कमजोरी समजू नका. आमच्या देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही तयार आहोत असं देखील नवाज शरीफ यांनी म्हटलं आहे.
काल रात्री सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतावादी कारवाया रोखण्यासाठी पाकला भारताने जोरदार झटका दिला. काल दहशतवाद्यांच्या काही टोळ्या भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत होत्या. भारताने लाईन ऑफ कंट्रोलच्या पलिकडे असणारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लष्करानं नियंत्रण रेषेपलिकडे दोन किलोमीटर आज जाऊन दहशतवाद्यांचे पाच तळ उधळून लावले.