चेन्नई : तामिळनाडूमध्ये  AIADMK पक्षाच्या दोन गटांमध्ये सुरू असलेल्या दिलजमाईच्या प्रयत्नांमध्ये नवा अडसर निर्माण झालाय. दोन्ही गट एकत्र यावेत यासाठी पक्षाचे सहसचिव टीटीव्ही दिनकरन स्वतःहून पायउतार झाल्यानंतर आता ओ पनीरसेल्वम गटानं नवी मागणी पुढे रेटलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी महासचिव शशिकला आणि दिनकरन यांच्यासह त्यांच्या 30 निष्ठावंतांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी माहणी केलीये. या दोघांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र परत घ्यावं, असं पनीरसेल्वम गटाचं म्हणणं आहे.


तसंच जयललितांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश पलानीस्वामी सरकारनं द्यावेत, अशीही पनीरसेल्वम यांची मागणी आहे. या मागण्यांची पूर्तता झाल्यानंतरच विलिनीकरणाबाबत चर्चा होऊ शकते, असं पनीरसेल्वम यांचे निकटवर्ती के.पी. मुनूसामी यांनी म्हटलंय.