मुंबई : भ्रष्टाचारमुक्त राष्ट्र बनवण्यात जर मोदी सरकारला सर्वात जास्त यश कशात आले असेल तर ते आहे पासपोर्ट सेवेत. आत्ताच्या घडीला जवळजवळ ७ कोटी जनतेकडे पासपोर्ट आहेत, ज्यातील दी़ड को़टी हे मोदी सरकार आल्यानंतरचे आहेत, असा दावा मंत्रालयाने केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कशी आहे प्रक्रिया


आधार कार्ड, पॅन कार्ड, आणि वोटर आयडी कार्ड या फक्त ३ कागदपत्रांच्या सहाय्याने आता आठवड्याभरात पासपोर्ट मिळणार आहे. यामुळे पासपोर्ट ऑफिसबाहेरील दलालांचे प्रमाणही कमी होईल. दिल्लीच्या पासपोर्ट अधिकाऱ्य़ाने दावा केला आहे की आता पासपोर्ट ऑफिसबाहेरील दलालांचे प्रमाण हे ९९ टक्क्यांनी कमी झाले आहे.  

पासपोर्ट बनविण्यासाठी आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन झालीये. याकरिता अर्जदाराला passportindia.gov.in या वेबसाईट वर जाऊन लॉग ईन करावे लागेल. त्यानंतर फक्त एकदाच पासपोर्ट ऑफिसमध्ये एक तासाकरिता जाऊन पूर्ण प्रक्रिया होईल.

ज्यांना ऑनलाईन व्यवहाराचे ज्ञान नाही त्यांच्याकरिता वेगळे ऑफिस काढण्यात आले आहे. १०० रूपये देऊन ही लोक ऑनलाईन अर्ज करू शकतात.
यानंतर तुम्हाला ७ वर्किंग डेज मध्ये पासपोर्ट अधिकाऱ्यास भेटायला बोलाविण्यात येईल.

तुमच्या कागदपत्रांत दोष असल्यास दुसरी संधी देखील दिली जाईल. पासपोर्ट हा पोलीस वेरीफीकेशनच्या आधीच मिळेल. पोलिसांकडून कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली आहेत. आता तसे घडल्यास तुम्ही ई-मेल, किंवा ट्विटर च्या माध्यमातून पासपोर्ट केंद्राशी संपर्क करू शकता.