बिल भरण्यासाठी त्याने दिल्ली तब्बल ४० हजारांची चिल्लर
पंतप्रधान मोदींनी ५०० आणि २००० रुपयांच्या नोटावर बंदी आणल्यानंतर सुट्टे पैशांची चांगलीच चणचण भासायला लागलीये. हॉस्पिटलस, मार्केट या ठिकाणीही ५००, १०००च्या नोटी स्वीकारल्या जात नसल्याने लोकांची चांगलीच पंचाईत झालीये.
कोलकाता : पंतप्रधान मोदींनी ५०० आणि २००० रुपयांच्या नोटावर बंदी आणल्यानंतर सुट्टे पैशांची चांगलीच चणचण भासायला लागलीये. हॉस्पिटलस, मार्केट या ठिकाणीही ५००, १०००च्या नोटी स्वीकारल्या जात नसल्याने लोकांची चांगलीच पंचाईत झालीये.
हॉस्पिटल्समध्येही पेशंटकडून बिलासाठी ५००, १०००च्या नोटा स्वीकारल्या जात नाहीयेत. त्यामुळे रुग्णांचेही एकप्रकारे हालच सुरु आहेत. पश्चिम बंगालमधील एका माणसाने तब्बल ४० हजार रुपयांचे बिल्ल चिल्लरमध्ये भरले. त्यानंतर त्याला डिस्चार्ज मिळाला.
सुकांता छाऊले असे या माणसाचे नाव आहे. ५००, १०००च्या नोटांवर बंदी आणल्यानंतर हॉस्पिटलमध्येही या नोटा स्वीकारल्या जात नाहीयेत. डेग्युंच्या आजारामुळे सुकांता यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ४० हजार रुपयांचे बिल झाले. मात्र ५०० आणि १०००च्या नोटा असल्याने बिल कसे भरायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला.
हॉस्पिटल प्रशासन ५०० आणि १०००च्या नोटा स्वीकारत नव्हते तसेच चेकनेही त्यांनी बिल भरण्याचा प्रयत्न केला मात्र तोही हॉस्पिटलकडून मान्य झाला नाही. अखेर त्यांनी व्हॉटसअॅपवरुन याबाबतचे आवाहन केले आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. ४० हजार रुपयांचे बिल त्यांनी चक्क चिल्लरमध्ये भरले.