मुंबई :  पेमेंट वॉलेटच्या सुविधेनं चर्चेत आलेल्या पेटीएमचं आजपासून पेटीएम बँकेत रुपांतर झालंय. त्यामुळे पेटीएमच्या वॉलेटमध्ये पैसे ठेवून व्याज गमावण्याचा धोकाही आता संपलाय. पेटीएमच्या वॉलेटमध्ये असणाऱ्या रकमेवर आता कंपनी ४ टक्के व्याज देणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात सध्या पेटीएमसह तीन पेमेंट बँका आहेत. त्यात एअरटेल पेमेंट बँक, इंडियन पोस्टल सर्व्हिसेची पेमेंट बँक अस्तित्वात आहे. या दोन्ही पेमेंट बँका  पेटीएमपेक्षा जास्त व्याज देतात. पण पेटीएमकडे सध्या जवळपास दोन कोटी युझर्स आहेत.


दरम्यान पेटीएमच्या सर्व वॉलेट धारकांना या बँकेचे खातेदार होता येणार आहे. त्यासाठी paytm.paymentbank.com या वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करावी लागणार आहे. ज्यांना पेटीएम बँकेत अकाऊंट ओपन करायचं नसेल, अशांना व्याज मिळणार नाही पण वॉलेटची सुविधा अशीच मोफत वापरता येणार आहे.