तिरुवनंतपुरम : हॉरर फिल्म बघायला काही उत्साही असतात तर काहींना रस असतो. मात्र हीच हॉरर फिल्म जीवघेणी ठरेल असा कोणी कधी विचार पण नसेल केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

का जीवघेणी ठरली हॉरर फिल्म


एका ६५ वर्षीय व्यक्तीची 'द कॉन्ज्यूरिंग-२' ही हॉरर फिल्म बघतांना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. गुरूवारी रात्री केरळ येथील तिरुवनामलाई येथे ही घटना घडली आहे.


टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेले हे दोघे 'द कॉन्ज्यूरिंग-२' फिल्मचा रात्रीचा शो पहायला 'श्री बालासुब्रमण्यम सिनेमा' येथे गेले होते. पोलिसांच्या सांगण्यानुसार त्या दोघांमधील एका व्यक्तीच्या छातीत अचानक दुखायला लागले आणि तो तिथेच बेशुद्ध पडला. जेव्हा त्याला रूग्णालयात नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


डेड बॉडी गायब


रूग्णालयातील एका स्टाफने मृत व्यक्तीच्या साथीदाराला सांगितले की डेड बॉडीला पोस्टमॉर्टमकरिता घेऊन जातोय, मात्र स्टाफ ती डेड बॉडी घेऊन गायब झाला. पोलीस या गोष्टींचा तपास घेत आहेत.