नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल किंमती पुन्हा एकदा कपात करण्यात आलेय. विशेष म्हणजे यावेळी डिझेल दरात चांगली घट केलेय. त्यामुळे काही प्रमाणात महागाईत दिलासा मिळाला आहे. आज मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होतील.


पेट्रोल ७४ पैशांनी तर डिझेल १.३० रुपयांनी लिटर मागे स्वस्त झाले आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेल किंमतीत वाढ करण्यात आली होती. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता केलेली कपात ही किरकोळ आहे. तर वाढविताना मोठी वाढ केली जाते, याबाबत वाहन चालकांतून तसेच लोकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे..