या नव्या अटीमुळे सरकारी-खासगी कर्मचारी चिंतेत
खासगी क्षेत्रात अनेक वेळा राजीनामा देऊन दुसऱ्या संस्थेत कर्मचारी रूजू होतात.
नवी दिल्ली : पीएफची रक्कम काढताना टॅक्स लावण्याचा प्रस्ताव सरकारने मागे घेतला असला, तरी एका नव्या अटीमुळे खासगी तसेच सरकारी नोकरदारांची चिंता वाढली आहे.
पीएफमधील पैसा सरकारी-खासगी कर्मचाऱ्यांना वयाची ५८ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच काढता येणार आहेत. वयाची ५८ वर्ष पूर्ण होण्याआधी जर त्यांना पैसे काढायचे असतील, तर त्यांना फक्त जमा रकमेच्या ५० टक्के रक्कम काढता येणार आहे.
खासगी क्षेत्रात अनेक वेळा राजीनामा देऊन दुसऱ्या संस्थेत कर्मचारी रूजू होतात, त्या दरम्यान ८० टक्के लोक आपला पीएफ काढून घेतात.
आजच्या तारखेला कर्मचाऱ्यांना कमीत कमी १२ टक्के पीएफ जमा करणे अनिवार्य आहे. कंपनीही आपला १२ टक्के वाटा पीएफवर जमा करते. त्यातील 3.67 टक्के पीएफ आणि 8.33 टक्के पेन्शन फंडमध्ये जाते. नव्या नियमानुसार ५८ वर्ष वय झाल्यानंतरच संपूर्ण रक्कम परत मिळेल, त्या आधी पैसे काढले तर ५० टक्केच रक्कम मिळणार आहे.