मुंबई : तुम्ही नोकरी करताना भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) जमा होत राहतो. मात्र, तुम्ही एखादी नोकरी बदली तर पीएफमधील पैसै काढण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागतात. मालकाची किंवा कंपनीच्या सहीची गरज असते. आता तुम्हाला मालकाच्या सहीची गरजच भासणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपला पीएफ काढून घेण्यासाठी सुटसुटीत पद्धत अवलंबिली आहे. त्यामुळे यापुढे मालकाची सही लागणार नाही. ईपीएफओने युनिव्हर्सल अकाउंट नंबर अर्थात यूएएन मिळालेल्या असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पीएफ काढण्यासाठी नवा, सुटसुटीत अर्ज तयार केला आहे.


नोकरीच्या कालावधीत जमलेला पीएफ काढून घेण्यासाठी ‘यूएएन आधारित फॉर्म १९’ वापरून, मालकाच्या किंवा कंपनीच्या सही शिक्क्याशिवाय तो काढता येणार आहे. ईपीएफओचे सदस्य असलेल्या व यूएएन क्रमांक असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही सुविधा वापरता येणार आहे. 


मात्र, यासाठी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बँक खाते आणि आधार क्रमांक याआधारे केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आवश्यक आहे. यूएएन क्रमांक वापरात आणलेला असणे आवश्यक आहे. सही शिवाय पीएफ काढण्यासाठी सध्या फॉर्म ईपीएफओ ऑफलाइन देत आहे. लवकरच तो ऑनलाइनही उपलब्ध मिळणार आहे.  


PF केव्हा काढता येतो?


- पीएफचा अंतिम दावा करणारा कर्मचारी ५५ वर्षे पूर्ण केलेला असावा. 
- यात कंपनी किंवा मालकाचे पीएफमधील योगदान, पीएफवरील व्याज आणि कर्मचाऱ्याने साठवलेला पीएफ यांचा समावेश असेल
- निवृत्तीचे वय जवळ आले असल्यास, ५४ वर्षांवरील कर्मचारी पीएफमधील काही रक्कम काढून घेऊ शकतो
- एखाद्याने वयाच्या ५५ वर्षांच्या आता नोकरी सोडल्यास
- सध्याच्या नियमांतर्गत तो कर्मचारी सलग ६० दिवस नोकरीच्या बाहेर असेल, तर सर्व पीएफ काढू शकतो


पीएफवर कर लागतो का?


- सलग ५ वर्षे एकाच ठिकाणी नोकरी झाल्यानंतरच्या स्थितीतील पीएफ काढण्यावर कर लागत नाही
- ५ वर्षांचा कालावधी एकाच ठिकाणी पूर्ण करण्यापूर्वी नोकरी बदलल्यास किंवा नव्या नोकरीकडे पूर्वीचा साठवलेला पीएफ वळवल्यास ती सलग नोकरी धरली जाते
- त्यामुळे सलग पाच वर्षे नोकरी हा पीएफसाठी महत्त्वाचा दुवा आहे.
- सलग ५ वर्षे नोकरी न करता मध्येच पीएफ काढून घेतल्यास त्यावर कर आकारला जातो
- असा पीएफ काढण्याच्या वर्षी मालकाचे योगदान आणि पीएफवरील मिळालेले व्याज करपात्र असते
- कर्मचाऱ्याच्या स्वतःच्या योगदानावर मिळालेले व्याजही करपात्र असते