नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभेत आपल्या गोंधळानं देशात बदनाम झालेल्या खासदारांची पगार वाढीची मागणी तूर्तास लांबणीवर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच खासदारांना खर्च कमी करण्याचा सल्ला दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसदेतल्या अडीचशे खासदारांच्या सहीचं एक निवेदन घेऊन 15 खासादारंचं एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलं. या निवेदनात खासदारांचा पगार दुप्पट करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. शिवाय खासदारांचा विकास निधी 25 कोटी करण्यात यावा असंही या निवेदनात म्हटलंय. 


पंतप्रधानांनी मात्र खासदारांच्या पगारवाढीच्या मागणीला बगल दिली असून...त्यांना खर्चात कपात करण्याचा सल्ला दिलाय. पण खासदारांची निधी वाढवून देण्याच्या मागणीवर मात्र सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मोदींनी दिलंय.