नवी दिल्ली : नोटबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य लोकांसाठी एक मोठं सरप्राईज देऊ शकतात. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार मोदी सरकार गरीब आणि मध्यमवर्गीय वर्गासाठी मोठ्या योजनेची घोषणा करु शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार पुढच्या बजेटमध्ये एक मोठी योजना आणण्याच्या तयारीत आहे. मध्यम वर्ग आणि गरीब वर्ग अशा २ वेगवेगळ्या वर्गासाठी योजना आखण्यात येत आहे. यासाठी सरकारने एक समिती तयार केली आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये याचे संकेत देऊ शकतात. त्यासाठी सरकारने लोकांकडून वेगवेगळ्या आयडिया मागवल्या आहे. नोटबंदीनंतर सरकारकडे मोठ्य़ा प्रमाणात पैसे जमा झाले आहेत. काही महिन्यांमध्ये सरकारकडे कमीत कमी 3 लाख करोटी रुपये जमा होतील. गरीब आणि मध्यम वर्गा व्यक्तीवर हो पैसा खर्च केला जाईल. ही योजना मोठ्या प्रमाणात असून ती २०१९ पर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.


पीएमओकड़ून देखील हे संकेत मिळत आहे की, ही योजना लोकांकडे पोहोचावी आणि त्याचा लाभ लोकांना व्हावा म्हणून सरकारचा प्रयत्न असणार आहे. मध्यम वर्गाला टॅक्समध्ये मोठी सवलत देण्याची शक्यता आहे.