नवी दिल्ली : काल रात्री सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतावादी कारवाया रोखण्यासाठी पाकला जोरदार झटका दिला आहे. लाईन ऑफ कंट्रोलच्या पलिकडे असणारे दहशतवादी तळ भारतीय जवानांनी उद्ध्वस्त केले आहेत. आज सकाळी कॅबिनेटच्या सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर जाहीर करण्या आली.यापुढे असे हल्ले करण्याचा इरादा नाही. पण पाकनं दहशतवाद्यांना पाठिंबा देणं थांबललं नाही तर, अशा कारवाया कराव्या लागतील असं लष्करी कारवाईचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.


भारतीय लष्काराने केलेल्या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या पक्षांची बैठक बोलावली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान या बैठकीत सगळ्यांना याबाबतची माहिती देणार आहेत आणि पुढची रणनिती काय असणार आहे आणि कसं सोबत मिळून काम करायचं आहे. याबाबत पंतप्रधान मोदी सगळ्या पक्षांशी चर्चा करणार आहेत.