उरी हल्ल्यानंतर मोदी आज साधणार जनतेशी संवाद
उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच जनतेशी संवाद साधणार आहेत. कोझीकोडमधून आज दुपारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधतील.
नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच जनतेशी संवाद साधणार आहेत. कोझीकोडमधून आज दुपारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधतील.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणाव कमालीचे वाढलेत. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाईसाठी सरकारवर दबाव वाढत चाललाय. त्या धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या भाषणाकडे सा-यांचं लक्ष लागलंय.
शुक्रवारपासून केरळमधील कोझीकोडमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी सुरु आहे. तीन दिवसांच्या या कार्यकारिणीत भाजपचे एक हजार 700नेते सहभागी झालेत.
भाजप अध्यक्ष अमित शाह हे देखील शुक्रवारीच कोझीकोडमध्ये दाखल झालेत. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यकारिणीत सामील होणार असून आज ते काय बोलणार याकडे सा-यांचं लक्ष लागलंय.