नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल हे एकमेकांचे कट्टर विरोधक, पण पंतप्रधानांनी आता ट्विटरवर थेट अरविंद केजरीवालांना फॉलो केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदींनी फॉलो केल्याचं समजताच केजरीवालांनीही त्यांचे आभार मानले. आज होळीचा दिवस आहे, जुन्या कडू गोष्टी विसरायचा आजचा दिवस आहे, भविष्यात दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार सहकार्यानं काम करतील, असं ट्विट केजरीवालांनी केलं आहे. 


मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्लीत केजरीवालांचं सरकार आलं. त्यानंतर मात्र केजरीवाल सरकार आणि केंद्र सरकारमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. पंतप्रधान हे भित्रे आणि मनोरुग्ण असल्याची टीकाही केजरीवालांनी केली होती. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर चौदाशे जणांना फॉलो करतात. तर मोदी हे फॉलोअर्समध्ये भारतात दुसऱ्या क्रमांकावर तर राजकारण्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांना 18.8 मिलीयन नागरिक फॉलो करतात. तर अमिताभ बच्चन यांना सगळ्यात जास्त 20 मिलीयन लोक फॉलो करतात. फॉलोअर्सच्या संख्येमध्ये केजरीवाल हे मोदींनंतर दुसऱ्या क्रमांकाचे राजकारणी आहेत.