नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून दहावी आणि बारावीतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांना मेहेनतीचं महत्त्व पटवून दिलं. सोबतच शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देण्याचीही सूचना केली.

 

मन की बातमध्ये सुरुवातीला त्यांनी सैनिकांबाबत गौरवोद्गार काढले. तर उद्या महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी अकरा वाजता दोन मिनिटांच मौन पाळण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. तर वसंत ऋतू निमित्तानंही मोदींनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.