उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध
जम्मू-काश्मीरच्या उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर पहाटे 5.30च्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. लष्कराच्या 12 व्या ब्रिगेडच्या मुख्यालयावर हा हल्ला करण्यात आला.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर पहाटे 5.30च्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. लष्कराच्या 12 व्या ब्रिगेडच्या मुख्यालयावर हा हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात 17 जवानांना वीरमरण आलंय. तर 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. चारही दहशतवादी हे पाकिस्तानचे असल्याचं समोर आलंय. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तोयबाने स्वीकारली आहे. उरी येथील 12 व्या ब्रिगेडच्या मुख्यालयात पहाटे चारच्या सुमाराला चार दहशतवाद्यांनी हा हल्ला केला.
उरी इथे झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निषेध केलाय. या हल्ल्यामागे असलेल्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही असं पंतप्रधानांनी म्हटलंय. संरक्षणमंत्री स्वतः जम्मू काश्मीरमध्ये जाऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवतील असं पंतप्रधान म्हणाले.