बंगळूरु : जे नोटाबंदीला विरोध करतायत ते काळ्या पैशाचे राजकीय पुजारी असल्याची खरमरीत टीका आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलीय. बंगळूरूमध्ये प्रवासी भारतीय दिवसाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काळ्या पैशानं आपलं राजकारण, समाज, अर्थव्यवस्था सारं काही पोखरलंय.  मोदी सरकारनं या काळापैशाविरोधात लढाई सुरु केलीय. असंही मोदींनी यावेळी म्हटलंय.  


यावेळी बोलताना मोदींनी परदेशस्थ भारतीयांनी देशासाठी केलेल्या योगदानाचाही गौरव केला. तीन दिवस चालणाऱ्या प्रवासी भारतीय परिषद यंदा बंगळूरुमध्ये आयोजित करण्यात आली आहे.  


मॉरिशिअसमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांना ओसीआय कार्ड देण्याचा प्रारंभ झाला असून इतर देशातही ही सुविधा लवकरच सुरू होईल असं आश्वासनही मोदींनी यावेळी दिलं.