नवी दिल्ली : भारतीय लष्कराने पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक करत जगाला आपलं शौर्य दाखवून दिलं. सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांचा उत्साह वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक अभियान सुरु केलं आहे. पंतप्रधान मोदींनी 'संदेश टू सोल्जर्स' अभियान सुरू केलं आहे. यंदाच्या दिवाळीत तुमचा एक छोटाचा संदेश जवानाच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बातमीच्या शेवटी पाहा व्हिडिओ


'संदेश टू सोल्जर्स'च्या माध्यमातून सैनिकांना आपला संदेश पाठवून तुम्ही त्यांच्यासोबत आनंद साजरा शेअर करु शकता. आपल्या सगळ्यांची दिवाळी आनंदात आणि सुरक्षित साजरी व्हावी म्हणून सैनिक सीमेवर देशाच्या सीमेचं रक्षण करत आहेत.


या अभियानातून सैनिकांना पत्र आणि संदेश पाठवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.


नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून सुरक्षारक्षकांना ग्रीटिंग कार्ड किंवा शुभेच्या पाठवता येणार आहेत. MyGov.in वर देखील तुम्ही आपला संदेश पाठवू शकता. पोस्ट कार्डद्वारे ऑल इंडिया रेडिओच्या पत्त्यावर तुम्ही तुमचं रत्र पाठवू शकता.